*स्वदेशी उत्पादकता बचत गटांचे भविष्य तारणार – माजी खासदार रामदासजी तडस*
*ग्रामीण अर्थ चक्र सुधारण्याची संधी म्हणजे स्वदेशी उत्पादकता विक्रम ठाकरे यांचे प्रतिपादन*
गेल्या तीन दिवसांपासून म्हणजे दिनांक 10, 11 व 12 ऑक्टोबर 2025 या कालावधीत संत्रा लिलाव मंडी, कृषी उत्पन्न बाजार समिती वरुड येथे सांसद स्वदेशी मेळाव्याचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. या सांसद स्वदेशी मेळाव्याचा आज समारोप समारंभ व गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वर्धा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रामदासजी तडस होते.
या तीन दिवसीय स्वदेशी मेळाव्यामध्ये वरुड तालुका मोर्शी तालुका व संपूर्ण अमरावती जिल्हा व जिल्हा बाहेरील स्वदेशी उत्पादक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या तीन दिवसांमध्ये स्वदेशी उत्पादनांची मोठ्या प्रमाणात प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. या प्रदर्शनी मध्ये अनेक विविध बचत गटांतर्फे आपल्या नवनिर्मितीच्या संकल्पना गृह उपयोगी नवीन नवीन वस्तूंचे उत्पादन घेऊन अनेक महिला बचत गट सहभागी झाले. या प्रदर्शनीचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे या प्रदर्शनीमध्ये अत्यंत तळागाळातील आपल्या आर्थिक विकासाचा मार्ग खुला करणाऱ्या बचत गटांनी आपल्या विविध खाद्यपदार्थांसह सहभाग नोंदवला. आपल्या संस्कृतीला व परंपरेला आधारित अनेक उत्पादनांची भरमार व विशेष आकर्षण या प्रदर्शनीमध्ये विशेषत्वाने जाणवले. स्वदेशी मेळाव्यात भाग घेताना समारोपिय कार्यक्रमांमध्ये अनेक बचत गटांनी आपले अभिप्राय नोंदविताना, या कार्यक्रमाचे प्रकल्प संयोजक विक्रम नरेशचंद्रजी ठाकरे यांनी उपलब्ध करून दिलेल्या संधीबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभारही व्यक्त केले अनेक बचत गटांनी आपल्या वस्तूंचा प्रचार व प्रसार या ठिकाणी केला. याप्रसंगी अनेक बचत गटांचा त्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेबाबत गौरव सुद्धा करण्यात आला याप्रसंगी बचत गटांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचा विक्री प्रचार व प्रसार करण्याची संधी एका विशिष्ट व्यासपीठावरून उपलब्ध करून देण्यात आली या प्रदर्शनी मध्ये खाद्यपदार्थांपासून ते उन्हाळी वळवत गृह उपयोगी वस्तू विविध आयुर्वेदिक औषधे आपल्या दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या अनेक वस्तूंचा समावेश करण्यात आला होता.
स्वदेशी उत्पादकता बचत गटांचे भविष्य तारणार असे माजी खासदार रामदासजी तडस यांनी आपल्या भाषणातून सांगितले, तर ग्रामीण अर्थ चक्र सुधारण्याची संधी म्हणजे स्वदेशी उत्पादकता होय विक्रम ठाकरे यांनी आपक्या भाषणातून सांगितले.
यावेळी वर्धा लोकसभेचे माजी खासदार रामदासजी तडस, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्ञानेश्वरजी दाभाडे, डॉ.मनोहरजी आंडे, बाळूभाऊ मुरूमकर, अमितजी कुबडे, विशालजी सावरकर, निलेशजी फुटाणे, भाग्येशजी देशमुख, बाबारावजी बहुरूपी, विजयराव यावले, राजकुमारजी राऊत, प्रतिभाताई महल्ले, विद्याताई भुम्बर, माधुरीताई भगत, अर्चनाताई खांडेकर, बबलूभाऊ पावडे, बाबारावजी मांगुळकर, तुषारभाऊ निकम, राहुलभाऊ चौधरी, सुधाकरराव दोड, उल्हासराव लेकुरवाळे, प्रवीणजी कुबडे, नितीनजी खेरडे, नलिनीताई रक्षे, प्रथमेशजी महांगडे, उमेशभाऊ कांडलकर, आदी मान्यवर तसेच पंचक्रोशीतील शेकडो नागरिक उपस्थित होते.