*”आत्मनिर्भर भारत” अभियानाच्या नवनिर्मितीसाठी वरुड येथे “सांसद स्वदेशी मेळावा” चे थाटात उद्घाटन*
*आत्मनिर्भर भारत हा संकल्प तळागळापर्यंत नेऊ – खासदार डॉ.अनिलजी बोंडे*
*स्वदेशीचा मंत्र नवीन भारताची निर्मिती करतोय – माजी सभापती विक्रम ठाकरे*
*वरुड:दॆनिक कैलिफ़ोर्निया टाईम्स*
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती वरुड येथील संत्रा लिलाव मंडी येथे आज दिनांक १० ऑक्टोबर २०२५ ला आत्मनिर्भर भारताच्या नवनिर्मिती साठी सांसद स्वदेशी मेळाव्याचे उद्घाटन राज्यसभा खासदार डॉ. अनिलजी बोंडे यांचे हस्ते संपन्न झाले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविराजजी देशमुख होते.
या प्रदर्शनीत जिल्ह्यातील व जिल्हयाबाहेरील ७० बचत गट समाविष्ट झाले असून, या प्रदर्शनीत विविध गटांकडून तयार केलेली उन्हाळी वाळवट, नैसर्गिक उत्पादने, हस्तकला, कृषी आधारित, पर्यावरणपूरक उत्पादने पाहायला मिळाली. कौशल्यातून साकारलेली विशेष स्वदेशी उत्पादने, आपल्या दैनंदिन वापरातील स्वादिष्ट खाद्य पदार्थ उत्पादने, स्वदेशी इलेक्ट्रानिक उपकरणे, स्वदेशी कापड व साडी प्रदर्शनी, विविध हस्तकला, सजावट व कृषी उपयोगी उत्पादने, उद्योजकता मार्गदर्शन, उत्पादने प्रदर्शनी व विक्री, सांस्कृतिक कार्यक्रम व प्रबोधनात्मक कार्यक्रम या सर्वांचा या तीन दिवसीय प्रदर्शनीत समावेश आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात देश व राज्य प्रगती करत आहे. त्यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारत हा संकल्प तळागळापर्यंत नेऊ असे यावेळी राज्यसभा खासदार डॉ अनिलजी बोंडे यांनी सांगितले.
महिला भगिनीचे आर्थिक स्वावलंबन, आपल्या स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणे, महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, आणि समाजात “वोकल फॉर लोकल” या विचाराची जनजागृती करणे या प्रदर्शनीचे मुख्य उद्दिष्ट असून भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व राज्यसभा खासदार डॉ. अनिलजी बोंडे साहेब यांच्या पुढाकारातून या सांसद स्वदेशी मेळाव्याची मुहूर्तमेढ रोवली गेली तसेच स्वदेशीचा मंत्र नवीन भारताची निर्मिती करतो आहे, असे या कार्यक्रमाचे प्रकल्प संयोजक तथा वरुड पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे यांनी सांगितले. कार्यक्रमात ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला, मार्गदर्शन केले व सहकार्य केले त्यांचे विक्रम ठाकरे यांनी यावेळी आभार मानले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक राज्यसभा खासदार डॉ.अनिलजी बोंडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष रविराजजी देशमुख, जिल्हा अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, विनोदजी कलंत्री विदर्भ प्रांत अध्यक्ष, कॅट, शांतनुजी देशमुख सरचिटणीस तथा प्रभारी मोर्शी विधानसभा, ज्ञानेश्वररावजी दाभाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उल्हासराव लेकुरवाळे, शेळके साहेब, तहसीलदार वरुड, पिल्लारे साहेब, गटविकास अधिकारी, पं.स.वरुड, मुजावर साहेब, तालुका कृषी अधिकारी, चर्जन साहेब, AR वरुड, अमितजी कुबडे, गोपालजी पांडे, राजेशजी गांधी, वरुड व्यापारी संघ व कँट वरुड टीम चे अध्यक्ष,गिरीधरजी देशमुख, रूपालीताई सोंडे, कँट चे सचिव जगदीशजी उपाध्याय, अँड शशिभूषणजी उमेकर, स्वामीवासुदेवानंद महाराज महाराज, अशोकराव देशमुख, मनोहरजी बारसे, भाग्येशजी देशमुख, विद्याताई भुम्बर, विशालभाऊ सावरकर, निलेशभाऊ फुटाणे,, सुष्माताई सरोदे, बबलुभाऊ पावडे सभापती ए पी एम सी,उपसभापती
बाबारावजी मांगुळकर, तुषारभाऊ निकम, राजकुमारजी राऊत, राहुलभाऊ चौधरी तसेच जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील शेकडो बचत गटांची व मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती